ऐतिहासिक क्रांतीसमृद्ध सातारा जिल्हा. महान क्रांतीसूर्याची कुलभूमी व प्रेरित हुतात्म्यांची जन्मभूमी खटाव तालुका. अन याच तालुक्यातील शिवछत्रपतींचा पदस्पर्श लाभलेलं किल्ले वर्धनगड हे गाव. नावातच दिव्यत्त्वाचा वारसा सांगणारे हे गाव व त्याभोवतालचा विचारसमृद्ध परिसर म्हणजे अनेकविध क्षेत्रांमध्ये स्वतःचाच एक तेजोमय इतिहास सातत्याने उज्ज्वल करू पाहणारा एक राजमार्ग. अर्थातच शिक्षणक्षेत्र हे त्यातील एक दीपस्तंभ होय. गडाच्या पायथ्यापासून पूर्वेकडे जवळजवळ १५ किमी पर्यंत पसरलेलं हे वर्धनगड केंद्र म्हणजे शिक्षणक्षेत्राच्या आधुनिक तथा नाविन्यपूर्ण अशा बदलत्या प्रवाहात स्वतःचा विविधांगी ठसा उमटविणारा एक विकासकेंद्रबिंदू.
संगणकीय वेगाने वाहणाऱ्या ज्ञानप्रवाहात भूतकाळाच्या साथीने वर्तमानाशी सांगड घालत भविष्याचा लक्षवेध घेऊन स्वतःचे अनुभवविश्व समृद्ध करण्याचा आम्ही करतोय एक प्रामणिक प्रयत्न.
ज्ञानसंपन्न विद्यार्थी, अनुभवसमृद्ध शिक्षक अन परिपूर्ण प्रशासक बनताना थोडी साथ आमचीही...
Very nice effort . Find some time to visit this blog www.englishwithmahure.blogspot.in
ReplyDeleteनमस्कार गोरे सर तुम्ही बनवलेला जनरल रजिस्टर मला आवडला मला पण हा शिकायला आवडेल तुम्ही मला या मार्गदर्शन करा
ReplyDeleteप्रवेश निर्गम direct कसा fill up होतो tc bonafide असे विविध प्रकार बनवण्यासाठी मार्गदर्शन करा